undefinedश्री अग्रसेन महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी

378 views

देहूरोड, दि.४ (वार्ताहर रामकुमार आगरवाल) अग्रवाल युवक फाउंडेशनच्या वतीने देहूरोड येथील वैश्य समाज मंदिरामध्ये गुरुवारी (दि.3) अग्रवाल समाजाचे दैवत श्री श्री श्री 1008 महाराजाधिराज श्री अग्रसेन महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Fri Oct 04 2024

imageजयंती साजरी

 देहूरोड-देहूगाव अग्रसेन युवक फाऊडेंशनच्या वतीने चार दिवसीय कार्यक्रमांमध्ये म.गांधी जयंती दिवशी बुधवारी ( दि.2) महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदाब ,रक्तातील साखर,ईसीजी,औषधीपचार,दंत,डोळ्यांची मोफत तपासणी,तज्ञ डॉक्टरांकडून पोषण आहार,होमिओपॅथिक ,समुपदेशन आणि विशेष मार्गदर्शन करण्यात आले.


 ढोल ताशांच्या गजरात,फटक्यांच्या आतिषबाजी पुष्पवृष्टीत गुरुवारी ( दि.3 ) श्री अग्रसेन महाराजांच्या प्रतिमेचे मेन बाजारपेठेतून जोरदार मिरवणूक काढण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेची पूजन आरती करण्यात आली. त्यानंतर बाल मुलांचे फॅन्सी ड्रेस,डान्स स्पर्धा, दानशूर व्यक्तींचा सन्मान,गुणवंत विद्यार्थ्यांचा, लकी ड्रॉ, पारितोषिक वितरण असे कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महा अन्नधान्य कार्यक्रमाचा समारोप झाला.अग्रवाल समाजातील दानशूर व्यक्तीच्या सहभागाने अग्रसेन युवक फाऊंडेशन परिश्रम घेऊन प्रति वर्ष कार्यक्रम संपन्न करीत आहे.म्युझिकल तंबोला,दांडिया नाईटचे शुक्रवारी (दि.4 ) आयोजन करण्यात आले.


   देवीचे जागरण आणि भंडाराच्या महाप्रसादाने शनिवारी ( दि.5 ) चार दिवसीय कार्यक्रम समारोप होणार आहे.





लेटेस्ट अपडेट्स

474 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..