प्रशांत भागवत युवा मंच आयोजित ललिता पंचमी निमित्त भव्य कुंकुमार्चन सोहळा हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

477 views


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 months ago
Date : Sat Sep 27 2025

image

प्रशांत भागवत युवा मंचच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक


"प्रशांत भागवत यांच्या वतीने आयोजित केलेला सामुदायिक कुंकूमार्चन सोहळा कार्यक्रम सांगून जातोय त्यांना महिलांचा उदंड आशीर्वाद मिळाला आहे. प्रशांत भागवत यांनी माता भगिनींना हेलिकॉप्टर सफर घडवली. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक कला क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. प्रशांत भागवत यांना विकासाची दृष्टी असून दातृत्व, मातृत्व, कर्तृत्व कार्यक्षम नेतृत्व आहे. प्रशांत भागवत यांच्या सर्वच इच्छा पूर्ण होतील असे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी वक्तव्य केले."


इंदोरी (दि.27) शारदीय नवरात्रोत्सवाच्या ललिता पंचमी निमित्त शुक्रवारी (दि.26) मावळ तालुक्यातील इंदोरी येथे प्रथमच सामुदायिक कुंकुमार्चन सोहळ्यात ते बोलत होते. प्रशांत भागवत युवा मंच यांच्या पुढाकाराने झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला तालुक्यातील विविध भागांतून हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


या सोहळ्यातील मुख्य आकर्षण होते कालिपुत्र कालीचरण महाराजांची महाआरती. त्यांच्या आरतीवेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात दंग झाला. त्यासोबतच शाहीर हरिदासजी शिंदे यांच्या संबळ वादक आणि शिवकालीन गोंधळी यांच्या सादरीकरणाने वातावरण अधिकच दैवी व मंत्रमुग्ध झाले.


महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्या परिधान करून, माथ्यावर फुलांचे गजरे माळून, ओवाळणीसाठी ताट घेऊन मोठ्या संख्येने या सोहळ्यात हजेरी लावली. देवीसमोर ओवाळणी करून एकमेकींच्या कपाळावर कुंकू लावून सौभाग्य, सुख व समृद्धीचे आशीर्वाद मागण्यात आले. “जय भवानी, जय जिजाऊ”, “अंबे मात की जय” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.


महिलांचा उत्साह आणि गावाच्या प्रत्येक चौकात फुलांनी केलेली सजावट यामुळे इंदोरी गाव पूर्णपणे भक्तिमयतेने न्हाऊन निघाले होते. देवीच्या चरणी नारळ, फुले व कुंकवाची वाहिली अर्पण करत सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण होते.


या कार्यक्रमाला मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके व त्यांच्या पत्नी सारिका ताई शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, मा. सभापती ज्योतीताई शिंदे, उपसरपंच बेबीताई बैकर, अनुपमाताई खांडगे, मेघाताई भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी, पोलीस प्रशासन व हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला.


 जगदीश कुलकर्णी महाराज, शाहीर हरिदासजी शिंदे, धनंजय दाभाडे, सरपंच शशिकांत शिंदे, उद्योजक संकेत शिंदे, रामदास शिंदे, बबन आल्हाट, भरत घोजगे, सुनील वाळुंज, नंदकुमार शेलार, भानुदास दरेकर, सुनील दाभाडे, बाबासाहेब घोजगे, प्रदीप बनसोडे, चंद्रकांत भागवत, उपसरपंच संदीप ढोरे, दिनेश चव्हाण, आशिष ढोरे, नितीन ढोरे, अंकुश ढोरे, अनिल राऊत, नंदकुमार भागवत आदी मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळा भव्यतेने पार पडला.


प्रशांत भागवत यांची दूरदृष्टी व उपक्रमशीलता यामुळे प्रथमच एवढ्या भव्य आणि दिव्य पद्धतीने कुंकुमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यांच्या प्रयत्नामुळे मावळ तालुक्यातील महिलांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरला. महिला एकता, भक्तीभाव आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम या उपक्रमातून घडल्याने तालुक्याच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरा अधिक भक्कम होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


या उपक्रमामुळे प्रशांत भागवत युवा मंचाने पुन्हा एकदा “सामाजिक-सांस्कृतिक चळवळीत आघाडी” घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले असून, मावळ तालुक्याच्या सांस्कृतिक नकाशावर इंदोरी गावाने नवा ठसा उमटविला आहे.


हजारो महिलांचे आभार व्यक्त करताना प्रशांत भागवत म्हणाले -“मावळ तालुक्यातील प्रत्येक भगिनींनी एवढ्या उत्स्फूर्ततेने या कुंकुमार्चन सोहळ्यात सहभागी होऊन आमचं आयोजन यशस्वी केलं. पण माझ्यासाठी खऱ्या अर्थाने कार्यक्रम तेव्हाच यशस्वी झाला, जेव्हा हजारो महिलांनी भक्तिभावाने सहभागी होऊन सुरक्षितपणे, व्यवस्थित त्यांच्या घरी परतल्या. आज या सोहळ्यामुळे देवीची कृपा आपल्या सर्वांवर राहो आणि मावळ तालुका संस्कृती, भक्ती आणि परंपरेत अधिक समृद्ध होवो, हीच माझी प्रार्थना आहे.”




लेटेस्ट अपडेट्स

1056 views
Image

मावळच्या 4 तहसीलदारांसह 10 अधिकाऱ्यांचे निलंबन ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा: मंगरूळ येथे 90 हजार ब्रास जास्त उत्खनन

नागपूर दि.13 (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात तब्बल 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.12) या घोटाळ्यात दोषी आढळलेले चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने दोषीवर फौजदारी व महसुली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


Read More ..
289 views
Image

मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी

नागपूर दि.9 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.


Read More ..
836 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..