पंढरपूर बस अपघातातील आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

1313 views

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) पंढरपूर बस अपघातातील गंभीर जखमी सुरेखा सहादू म्हाळसकर वय 52 रा. नाणे ता. मावळ यांचा उपचारादरम्यान सोमवारी (दि.13) पहाटे 6 वा मृत्यू झाला.


Author : Admin
Publisher : admin
Update : 9 months ago
Date : Wed Jan 15 2025

imageसुरेखा म्हाळसकर

नाणे मावळ येथून देव दर्शनासाठी निघालेल्या बसची ट्रकला जोरात घडक होवून दि.29/12/24 पहाटे 6:10 वा भटुंबरे पंढरपूर जवळ 

अपघात झाला. या अपघातातील मृत्यूंची संख्या तीन झाली आहे.

सोमवारी (दि.13) पहाटे 6 वा. सुरेखा सहादू म्हाळसकर वय 52 रा. नाणे ता. मावळ यांचे उपचारादरम्यान सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला.



अपघाताच्या दिवशी बिबाबाई सोपान म्हाळसकर (वय 62)

व जानवी विठ्ठल म्हाळसकर (वय 12) यांचा मृत्यू झाला.

एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. 

एकूण 28 जण जखमी होते. त्यात सातजण गंभीर जखमी होते. त्यापैकी आता अंजली संतोष राक्षे व संतोष मारुती राक्षे दोघेजण चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. सातजण सद्यस्थिती उपचारच घेत आहेत. या जखमींच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे. औषधोचारासाठी लाखोंचा खर्च होत आहे.


या घटनेने मावळ मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.




लेटेस्ट अपडेट्स

479 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..