वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी अभिजीत देशमुख

1119 views

वडगाव मावळ दि.10 (प्रतिनिधी) वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अभिजीत सुभाष देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला.


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 months ago
Date : Fri Oct 10 2025

image

वडगाव मावळ दि.10 (प्रतिनिधी) वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अभिजीत सुभाष देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला.



 पोलीस निरीक्षक कुमार कदम यांची बदली सासवड पोलीस स्टेशन येथे झाली. 

 सन 2005 मध्ये स्पर्धा परीक्षेतून पोलीस उप निरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू प्रथम गडचिरोली, ठाणे ग्रामीण, रत्नागिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कोल्हापूर, पोलीस निरीक्षक म्हणून सांगली व पुणे ग्रामीण वडगाव मावळ पोलीस निरीक्षक पदी रुजू झाले.

गोविंद पानसरे, एस एस कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनाच्या एसआयटी मध्ये तपासात सहभाग. 

अभिजित देशमुख म्हणाले वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहतूक कोंडी, अमली पदार्थ गुटखा कारवाई, गुन्हेगारीवर वचक ठेवणार. ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येणार.




लेटेस्ट अपडेट्स

1056 views
Image

मावळच्या 4 तहसीलदारांसह 10 अधिकाऱ्यांचे निलंबन ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा: मंगरूळ येथे 90 हजार ब्रास जास्त उत्खनन

नागपूर दि.13 (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात तब्बल 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.12) या घोटाळ्यात दोषी आढळलेले चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने दोषीवर फौजदारी व महसुली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


Read More ..
289 views
Image

मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी

नागपूर दि.9 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.


Read More ..
836 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..