जनसेवक कै. किशोरभाऊ आवारे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

662 views

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जनसेवक कै .किशोरभाऊ आवारे यांच्या जयंतीनिमित्त आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांना परीक्षा साहित्याचे वाटप कै. किशोरभाऊ आवारे मित्र परिवाराच्या वतीने माजी नगरसेवक रोहित लांघे यांच्या माध्यमातून करण्यात आले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 7 months ago
Date : Tue Nov 19 2024

image



कै. किशोर भाऊ आवारे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कै. किशोरभाऊ आवारे मित्र परिवाराच्या वतीने विविध ठिकाणी विनम्र पूर्वक अभिवादन करण्यात आले आहे. 

कै.किशोर भाऊ आवारे यांच्या जयंती निमित्ताने इयत्ता दहावीसाठी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत क्लासेस द्वारे प्रशिक्षण देण्याचे नापासांच्या शाळेचे संचालक प्रा. नितीन जी फाकटकर यांनी जाहीर केले आहे.


ऋतुराज काशीद मित्रपरिवारच्या वतीने इंदोरी येथील आश्रमातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले .

किशोरभाऊ आवारे यांनी कोल्हापूर रत्नागिरी महापूर ग्रस्तांना तातडीची मदत, कोरोना काळात रुग्णांना औषधोपचार, मानसिक आधार व मृतदेहावर अंत्यसंस्कार कार्य तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी कायमच मदतीचा हात देत होते. तळागाळातील लोकांसाठी चे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण होते, जनसामान्यांचा आधार असणाऱ्या किशोर भाऊंना सर्वच स्तरातून जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यात येत आहे





लेटेस्ट अपडेट्स

162 views
Image

*PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत*

मुंबई दि.11 (प्रतिनिधी) PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरआढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने शेळके यांच्या प्रयत्नांना अखेर यश लाभले आहे.


Read More ..