518 views
वडगाव मावळ दि.6 (प्रतिनिधी) मावळ तहसील कार्यालयाच्या महसूल नायब तहसीलदार पदी अविनाश प्रकाश पिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली.
महसूल नायब तहसीलदार प्रसन्न केदारी यांची बदली जुन्नर तहसीलदार कार्यालयात झाली त्या रिक्त पदावर शिरोळ तहसील कार्यालय जिल्हा कोल्हापूर नायब तहसिलदार अविनाश पिसाळ यांची नियुक्ती शासनाने केली.
2015 साली एमपीएससी उत्तीर्ण केली त्यानंतर अंबाजोगाई बीड येथे नायब तहसीलदार प्रथम नियुक्ती झाली. आतापर्यंत 10 वर्ष सलग सेवेत गडचिरोली येथे विशेष कामगिरी केली आहे.
महसूल नायब तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला असुन तहसीलदार विक्रम देशमुख, निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार जयश्री मांडवे, निवडणूक नायब तहसीलदार अमोल पाटील, मंडलाधिकारी बजरंग मेकाले, सुरेश जगताप, माणिक साबळे, तलाठी व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.