448 views
वडगाव मावळ दि.6 (प्रतिनिधी) येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व बीबीए महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागाच्या प्रमुख प्रियांका दत्ता पाटील या महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा कॉमर्स विषयात उत्तीर्ण झाल्या.
महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 मध्ये प्रियांका पाटील यांनी परीक्षा दिली, त्यात 300 पैकी 162 गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.
बी एन पुरंदरे महाविद्यालय लोणावळा येथे बी कॉम शिक्षण पूर्ण केले. इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथे एम कॉम शिक्षण पूर्ण केले. कला, वाणिज्य व बीबीए महाविद्यालयात कॉम्प्युटर विभागात नोकरी करत अभ्यास पूर्ण केला. 2010 साली अपघातात वडिलांचा मृत्यू झाला. कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून नोकरी करत अभ्यास करून यश मिळविले.
तिच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक गायकवाड, प्रा. महादेव वाघमारे, डॉ. शीतल दुर्गाडे, डॉ. शीतल शिंदे, प्रा. योगेश जाधव, डॉ. जया धावारे, प्रा. मोहिनी ठाकर, प्रा. अशोक कोकाळे, प्रा. प्रणिता सूर्यवंशी, प्रा. काजल सांगळे, अनिल कोद्रे, मंगल सस्ते, अनिता भांबळ आदींनी शुभेच्छा दिल्या.
यशाबद्दल प्रियांका पाटील म्हणाल्या जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व सातत्याने अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते.