लोणावळ्यात ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेविका,उपशहरप्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश
वडगाव मावळ दि.28 (प्रतिनिधी) ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ज्येष्ठ माजी नगरसेविका कल्पना आखाडे, नगरसेविका सिंधूताई परदेशी यांच्यासह उपशहरप्रमुख, विविध पदाधिका-यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्वांचे शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल अशी ग्वाही दिली.
Read More ..