साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिनाक्षी आगळमे

663 views

वडगाव मावळ दि.25 (प्रतिनिधी) साते ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मिनाक्षी मंगेश आगळमे यांची एकमताने निवड करण्यात आली. सरपंच संदिप शिंदे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने त्या रिक्त जागेची गुरुवारी (दि.20) निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी मिनाक्षी मंगेश आगळमे व श्रुती धैर्यशील मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मतदान घेण्यात आले. मिनाक्षी आगळमे यांना 6 तर श्रुती मोहिते यांना 5 मते मिळाल्याने मिनाक्षी आगळमे यांनी एकमताने सरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 10 months ago
Date : Tue Mar 25 2025

image



निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी मंडलाधिकारी सुरेश जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.


याप्रसंगी उपसरपंच आम्रपाली नितीन मोरे, सदस्य गणेश शिवाजी बोऱ्हाडे, ऋषिनाथ मारुती आगळमे, संदीप दिनकर शिंदे,संतोष पोपटराव शिंदे, सखाराम काळोखे,आरती सागर आगळमे, ज्योती मुकुंद आगळमे, श्रुती धैर्यशील मोहिते, वर्षा स्वप्नील नवघणे, माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब आगळमे, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. 

नवनियुक्त सरपंच मिनाक्षी आगळमे यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारप्रसंगी मिनाक्षी आगळमे म्हणाल्या ग्रामस्थांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेला सरपंच पदाचा मान दिला. जो माझ्यावर विश्वास दाखवला व मला गावची व ग्रामस्थांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल व उर्वरित विकासाची कामे करण्यास मी कटिबद्ध राहील.




लेटेस्ट अपडेट्स

1024 views
Image

मावळच्या 4 तहसीलदारांसह 10 अधिकाऱ्यांचे निलंबन ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा: मंगरूळ येथे 90 हजार ब्रास जास्त उत्खनन

नागपूर दि.13 (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात तब्बल 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.12) या घोटाळ्यात दोषी आढळलेले चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने दोषीवर फौजदारी व महसुली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


Read More ..
264 views
Image

मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी

नागपूर दि.9 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.


Read More ..
812 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..