352 views
पुणे दि.10 (प्रतिनिधी) मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि.11) मराठा आरक्षण जनजागृती भव्य शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांच्यातर्फे आयोजित रॅलीचा प्रारंभ सारसबाग येथून होईल; तर डेक्कनच्या खंडुजी बाबा चौकात समारोप होईल.
'अखंड मराठा समाज पुणे जिल्हा चे अंकुश राक्षे व बाळासाहेब अमराळे यांनी शुक्रवारी (दि.9) पत्रकार परिषदेत माहिती दिली. जरांगे यांच्या गाड्यांचा ताफा कात्रजमार्गे सारसबाग येथे येणार आहे. सकाळी ११ वाजता सारसबागेतील गणपती मंदिरात - दर्शन घेऊन व अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून रॅलीला प्रारंभ होईल.
बाजीराव रस्ता, शनिवारवाडामार्गे 'एआयएसएसएमएस' येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून रॅली जंगली महाराज रस्त्याने पुढे जाईल. डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन करून खंडुजी बाबा चौकात रॅलीची सांगता होईल. पुणे जिल्ह्यातील अखंड मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने भव्य शांतता रॅली ला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.