पंतप्रधान मोदी यांनी दिला मावळातील भाजप मतदारांना थेट 'संदेश'

700 views

पुणे दि.13 (प्रतिनिधी) मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना मंगळवारी (दि.12) भाजपचे सर्वोच्च नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 7 months ago
Date : Wed Nov 13 2024

image


*आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद 'विजयी भव'!*


*आमदार शेळके यांच्या पाठीशी आता नरेंद्र मोदींचाही आशीर्वाद*






महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची आज (मंगळवारी) रात्री पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेतील भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना शेळके यांची औपचारिक ओळख करून दिली. त्यावेळी नतमस्तक होऊन शेळके यांनी मोदी यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर हस्तांदोलन करत पंतप्रधानांनी शेळके यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. 


त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 



मावळमध्ये भाजपचे काही नेते महायुतीचे उमेदवार असलेल्या शेळके यांच्या विरोधात काम करीत आहेत. त्यामुळे सुरुवातीला भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिल्यानंतर मात्र चित्र बदलले. भाजपचे बहुतांश कार्यकर्ते आता शेळके यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या आशीर्वादामुळे तालुक्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना व मतदारांना योग्य तो संदेश गेल्याचे मानण्यात येत आहे.





लेटेस्ट अपडेट्स

55 views
Image

कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान; पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्या सल्ल्यानेच :– आमदार सुनील शेळके

वडगाव मावळ दि.24 (प्रतिनिधी) “मी आमदार आहे, कारण तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात. आज निर्णय घ्यायचे असतील, तर तोही तुमच्या सल्ल्यानेच घ्यायचा,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आमदार सुनील शेळके यांनी पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका मांडली. वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी नवे संकेत दिले गेले. आमदार सुनील शेळके यांच्या सडेतोड भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. पक्षातील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, २० सदस्यीय समितीचा निर्णायक हस्तक्षेप, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन यामुळे हा मेळावा यशस्वी ठरला.


Read More ..
147 views
Image

गोल्डन रोटरी चा पदग्रहण समारंभ दिमाखात साजरा.

तळेगाव दाभाडे दि.18 (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ निगडी च्या सौजन्याने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचा चार्टर प्रदान व प्रथम पदग्रहण सोहळा सुशीला मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिमाघदार सोहळ्यात संपन्न झाला. सर्व सदस्यांनी एकसारखे जॅकेट घातल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली होती. 3131 चे प्रांतपाल शितल शहा व रोटरी क्लब ऑफ निगडी चे अध्यक्ष सुहास ढमाले यांच्या हस्ते चार्टर प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रांतपाल शितल शहा सहप्रांतपाल अशोक शिंदे प्रा डॉ मिलिंद भोई सहप्रांतपाल दीपक फल्ले निमंत्रक किरण ओसवाल हे व्यासपीठावर उपस्थित होते.


Read More ..