1514 views
वडगाव मावळ दि.14 (प्रतिनिधी) सहा.पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन 2024 चे राष्ट्रपती पदक त्यांना जाहीर करण्यात आले आहे.
प्रकाश वाघमारे हे पुणे ग्रामीण दलात सन 1991 चे बॅचचे असून त्यांची बारामती शहर पोलीस स्टेशन, देहुरोड , तळेगाव दाभाडे , वडगाव मावळ , स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण ) येथे काम केले आहे . सध्या ते लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत.
त्यांनी अनेक दरोडेखोर, खून करणारे , खुनाचे प्रयत्न करणारे,आरोपी, जबरी चोऱ्या , घरफोड्या चोऱ्या करणारे, अनाधिकृत गावठी पिस्तुल बाळगणारे आरोपीना जेरबंद करुन गुन्ह्यांचा तपास लावला आहे.
त्यांनी उल्लेखनीय केलेल्या कामाची दखल घेवून महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी सन 2017 मध्ये पोलीस महासंचालक पदक देवून सन्मानीत केले होते. त्यानंतर देखील सातत्याने उल्लेखनीय काम केल्याने भारत सरकारने दखल घेवून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगारी बद्दल सन 2024 चे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे त्यांना राष्ट्रपती पदक मिळाल्या बद्दल पोलीस दलात , तसेच सामाजीक, राजकीय स्तरातून कौतुक होत आहे.