पिंपरी, लोणावळ्यातील माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

202 views

पिंपरी दि.8 (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, लोणावळा येथील माजी नगरसेविका कल्पना आखाडे, माजी नगरसेविका सिंधुताई परदेशी, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव राजेश वाघोले, ठाकरे गटाचे मावळ तालुका संघटक मदन शेडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 5 months ago
Date : Thu May 08 2025

image






मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ताशेठ केदारी, शिवसेना मावळ उपतालुका प्रमुख

 राम सावंत, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, शिवसेना देहूगाव शहरप्रमुख सुनील हगवणे, शीलाताई भोंडवे,शिवसेना महिला शहर संघटिका शुभांगी काळंगे उपस्थित होते.




ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपशहर प्रमुख प्रकाश पठारे, संघटक रमेश नगरकर, उपविभाग प्रमुख अनंत जांभळे, उपविभाग प्रमुख हनुमंत ठाकर, उपशहर प्रमुख कामशेत सुरेश लाड, उपशहर प्रमुख कामशेत वैभव हजारे, राष्ट्रवादी औद्योगिक विभाग अध्यक्ष नवनाथ हरपुडे, ठाकरे गट शाखाप्रमुख श्रीपती तुर्डे, शाखाप्रमुख कैलास खरमारे, संघटिका अनिताताई गायकवाड, सहशहर संघटिका प्रियाताई पवार,  उपशहर प्रमुख लोणावळा विजय आखाडे, शाखाप्रमुख संकेत जाधव,उपसरपंच ईश्वर वाघोले, उपविभाग प्रमुख लोणावळा अनंत आंद्रे, दत्तात्रय झडे, भाऊसाहेब सकाटे, उदय वावरे,संकेत जाधव यांनीही शिवसेने प्रवेश केला.



खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या सर्वांना पक्षात मान, सन्मान दिला जाईल. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. त्यादृष्टीने शिवसेना कामाला लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला शिवसेना पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाणार आहे.




लेटेस्ट अपडेट्स

424 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..