पुण्यातील मंगेशकर हॉस्पीटलने गर्भवती महिलेवर वेळेत उपचार न दिल्याने मृत्यू; जुळ्यांना जन्म

682 views

पुणे दि.4 (प्रतिनिधी) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय नोंदणी असलेल्या रुग्णालयातच रुग्णसेवेला काळिमा फासला असून गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करतेवेळी अगोदर 10 लाख रुपये भरावे, त्यानंतरच दाखल केले जाईल असा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला होता.


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 months ago
Date : Fri Apr 04 2025

image

त्यामुळे, संबंधित महिलेला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी, प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आता सर्वत्र संताप व्यक्त होत असून आमदार अमित गोरखे यांनीही याप्रकरणी पोलिसात धाव घेतली आहे. तर, रुग्णालय प्रशासनाच्यावतीनेही आपली बाजू मांडण्यात आली आहे. पुण्यातील महिलेच्या मृत्यू प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाकडून रुग्णालयात अंतर्गत चौकशी करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून वस्तुस्थिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. 


तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. 


या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.


दरम्यान, या घटनेसंदर्भात दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार असून या संदर्भातील अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार आहोत. मीडियात सध्या बातम्या येत आहेत, त्या अर्धवट आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे, सध्या मला जास्त बोलता येणार नाही, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली.


आमदारांची पोलिसात धाव, गुन्हा दाखल करण्याची मागणी

विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी घेतली पुण्याचे सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन महिला भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गोरखे यांनी घटनेचा सर्व वृतांत सविस्तर पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांना सांगितला. त्यानंतर, योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे, आश्वासन शर्मा यांनी आमदार महोदयांना दिले आहे.


दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कदाचित थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या. 


सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणे किड्या मुंग्यांपेक्षाही बदतर होत आहे ज्याची कल्पनाच न केलेली बरी..




लेटेस्ट अपडेट्स

32 views
Image

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधीत यंत्रणांना निर्देश

चाकण दि.8 प्रतिनिधी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगााने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.


Read More ..
166 views
Image

नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन महसूल सप्ताह यशस्वी करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे दि.31 (प्रतिनिधी) महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी येत्या 1 ते 7ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होईल यावर लक्ष केंद्रित करत नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन सप्ताह यशस्वी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


Read More ..