घरी लवकर या सर्वच वाट पाहत आहेत

1930 views

श्री राहुल कल्लप्पा नागलगाव आपण घरी लवकर या सर्वच वाट पाहत आहेत


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 months ago
Date : Thu Aug 22 2024

imageघरी या

श्री राहुल कल्लप्पा नागलगाव यांना सांगू इच्छितो की, तुमच्या घरगुती चालू असलेल्या जमीन व मालमतेच्या वादासंबधि मी तुमचे नातेवाईक व तुमच्या मुळ गावातील नागणसुर मधील पंच मंडळी यांच्याशी विचारविनिमय केले असता त्यांनी वडीलोपार्जित संपत्ती मध्ये तुम्हा दोन भावामध्ये समसमान वाटप करण्याची ग्वाही दिली आहे. तुमची आई श्रीमती जगदेवी क. नागलगाव व भाऊ रोहित क. नागलगाव यांनी उपस्थित नातेवाईक व गावातील पंच मंडळी समक्ष स्टॅम्प पेपर वर वाटणीपत्रात लिहून दिले आहे की तुमच्या कुटुंबाला वडीलोपार्जित मिळालेल्या सर्व जमीन व मालमतेचे दोन समसमान भाग करून श्री राहुल क. नागलगाव व रोहित क. नागलगाव यांच्यामध्ये विभागून देण्याची संपूर्ण ग्वाही दिली आहे. तरी मी तुम्हाला कळकळची विनंती करतो की, स्वरा, आदिरा, तुमची पत्नी आणि तुमचे सर्व नातेवाईक तुमच्या भेटीसाठी व्याकूळ आहेत. आपण लवकरात लवकर घरी परतावे.

आपलाच 

ओम वि. बहिर्जे




लेटेस्ट अपडेट्स

88 views
Image

“लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांचे अल्फा-क्लोरालोज कीटकनाशकावर संशोधन व आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये शोधनिबंध प्रकाशित”

लोणावळा दि.3 (प्रतिनिधी) अल्फा-क्लोरालोज (α-chloralose) हा एक विषारी अंमली पदार्थ आहे, जो उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पक्षी मारण्यासाठी सर्रासपणे वापरला जातो. लोणावळा महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधकांनी प्रयोगशाळेत उन्नत स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रज्ञान, मॉलिक्युलर डाकिंग, सिमुलेशन आणि डीएफटी पद्धतींचा वापर करून मानवी शरीरातील रक्तात असलेल्या सिरम अल्ब्युमिन प्रथिनासोबत अल्फा-क्लोरालोज कीटकनाशकाची होणारी आंतरक्रिया उलगडली आहे. या संशोधनासंदर्भातला शोधनिबंध नुकतेच नेदरलँड येथून प्रकाशित होणाऱ्या “एल्सवेअर-जर्नल ऑफ मॉलिक्युलर लिक्विड, इम्पॅक्ट फॅक्टर ५.३” या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.


Read More ..