148 views
देहूरोड दि.13 ( प्रतिनिधी रामकुमार आगरवाल) उर्से येथून मुंबई पुणे महामार्गावरून निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथे जाणाऱ्या केबलसाठी लागणाऱ्या लाकडी ड्रमने भरलेले एका मालट्रकला गुरुवारी (दि.13 ) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. चालकाने सावधगिरी बाळगत देहूरोड पोलीस ठाण्यामध्येच ट्रक घातला.पोलिसांची धावपळ झाली. लागलीच तेथील पाण्याने ट्रक विझवण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुमारे एक तास उलटून गेल्या नंतरही कॅन्टोन्मेंट बोर्ड अथवा इतर कोणतेही अग्निशामक वाहन आले नव्हते.
उर्से येथील फिनोलेक्स केबल कंपनीतून केबल गुंडाळण्यासाठी असणारे लाकडी ड्रम घेऊन आझाद हिंद ट्रान्सपोर्ट कंपनीची एम एच 14 ए एस 8229 हा मालट्रक मुंबई पुणे महामार्गावरून निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथे जात होता. देहूरोड पोलीस ठाणे पासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयापाशी या ट्रकला अचानक आग लागली. आग थोडक्यात असताना गाडीतून धूर निघताना ट्रकच्या पाठीमागे असणारे दुचाकीस्वार कैलास पाटील व गोकुळ पाटील यांनी चालकाला सावध केले.
.देहूरोड पोलीस ठाण्याजवळील असलेले सेंट्रल चौकात सिग्नल मुळे गर्दी होती. गर्दी सारवत दुचाकीस्वाराने जवळ असणाऱ्या पोलीस ठाण्यातच पेटलेले वाहन घेण्यास सांगितले .पेटलेले वाहन पाहून पोलिसांची धावपळ सुरू झाली.पोलिसांनी तात्काळ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाला कॉल दिला.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या आदेशान्वये उपस्थित असणाऱ्या सर्वच पोलिसांच्या मदतीने पाणी मारण्यात आली .पंधरा मिनिटातच आग आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले. मात्र एक तास उलटून गेल्यानंतरही कॅन्टोन्मेंट बोर्डाची अग्निशमन दल पोहोचलेच नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणी आला आहे.