उकसान-शिरदे परिसरातील बिबट्या पिंजऱ्यात बंद; वैद्यकीय उपचारासाठी दाखल

1203 views

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यातील वनपरिक्षेत्र शिरोता हद्दीत उकसान-शिरदे परिसरात सोमवारी (दि.15) सकाळी बिबट हा वन्यप्राणी असल्याचे समजताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट पुणे टीमने धाव घेऊन बिबट्याला पकडून वैद्यकीय उपचारासाठी पुणे येथे रवाना केले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Mon Jul 15 2024

imageबिबट्या




 मावळात बिबट्या आढळल्याच्या अनेक बातम्या ग्रामस्थ सांगत असून कुत्री, वासरे व जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना समोर येत होत्या. वनविभागाने यशस्वीपणे बिबट्या पकडून नेल्याबाबत वनविभागाचे कौतुक होत आहे. ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.



शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी तत्काळ पोहचून परिसर पाहणी केली असता; बिबट प्राणी एका चारा साठवलेल्या गोठ्यामध्ये असल्याचे आढळन आले. सदर बिबट कदाचित अस्वस्थ असल्याचे तज्ञ पशुवैद्कीय डॉक्टर यांच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्या अनुषंगाने वन विभाग व रेस्क्यू टीम यांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याचे यशस्वीरित्या रेस्क्यु करण्यात आले. बिबट्यास पुढील तपासणी आणि उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र पुणे येथे तत्काळ पाठविण्यात आले आहे.




सदरची कामगिरी मुख्य वनसंरक्षक पुणे एन आर प्रविण , उप वनसंरक्षक पुणे महादेव मोहिते, (उपवनसंरक्षक पुणे), सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे यांचे मार्गदर्शनाखाली शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.सुशील मंतावार यांच्या नियंत्रणात वनपाल मंजुषा घुगे, वनरक्षक गजेंद्र भोसले, युवराज साबळे, दिपक उबाळे, सुरेश ओव्हाळ,शंकर घुले तसेच रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट चे सोनेश इंगोले, चेतन वंजारी,पूर्वा निमकर,नरेश चांडक, सायली पिलाने, वैष्णवी भांगरे, सागर शिंदे, केतन वैद्य आदींनी यशस्वीरीत्या बिबट्याला पकडून व्यवस्थित वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले.

 सदर कामगिरीबद्दल वनविभागाचे मावळ परीसरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





लेटेस्ट अपडेट्स

1330 views
Image

मावळच्या 4 तहसीलदारांसह 10 अधिकाऱ्यांचे निलंबन ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा: मंगरूळ येथे 90 हजार ब्रास जास्त उत्खनन

नागपूर दि.13 (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात तब्बल 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.12) या घोटाळ्यात दोषी आढळलेले चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने दोषीवर फौजदारी व महसुली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


Read More ..
454 views
Image

मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी

नागपूर दि.9 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.


Read More ..
994 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..