वडगाव मावळ महाविद्यालयाचा एन एस एस विशेष हिवाळी शिबिर संपन्न

509 views

वडगाव मावळ दि.1 (प्रतिनिधी) महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्याव्य क्तिमत्त्व विकासात मोलाचे ठरतात. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण व शहरी जीवनातील समस्यांची जाण होते असे प्रतिपादन व्याख्याते विवेक गुरव यांनी केले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Wed Jan 01 2025

imageविद्यार्थी श्रमदान करताना

श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व बीबीए महाविद्यालय वडगाव मावळ राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते. हे शिबिर आंदर मावळातील नागाथली येथे दि . 23 ते 29 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.



या शिबिरात शिवव्याख्याते संपत गारगोटे यांनी 'छत्रपती संभाजी महाराज' या विषयावर विचार मांडले. प्रा. सोमनाथ कसबे यांनी 'युवकांपुढील आव्हाने' या विषयावर विचार मांडले. शिबिराच्या समारोपप्रसंगी संस्थेचे संचालक राज खांडभोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम आसवले, सचिव अशोक बाफना, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, संचालक दत्ताभाऊ असवले, प्राचार्य अशोक गायकवाड व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहिणी चंदनशिवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. जया धावरे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गावाचा परिसर, गावातील रस्ते स्वच्छ केले. विविध प्रबोधनात्मक आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर पथनाट्ये सादर केली.




लेटेस्ट अपडेट्स

1038 views
Image

मावळच्या 4 तहसीलदारांसह 10 अधिकाऱ्यांचे निलंबन ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा: मंगरूळ येथे 90 हजार ब्रास जास्त उत्खनन

नागपूर दि.13 (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात तब्बल 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.12) या घोटाळ्यात दोषी आढळलेले चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने दोषीवर फौजदारी व महसुली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


Read More ..
273 views
Image

मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी

नागपूर दि.9 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.


Read More ..
822 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..