425 views
वडगाव मावळ दि.25 (प्रतिनिधी) येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व बीबीए महाविद्यालयात शनिवारी (दि.22) छञपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालय ते श्री पोटोबा महाराज मंदिरापर्यंत पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी शिवव्याख्याते विक्रांत शेळके यांचे छत्रपती शिवाजी महाराज व आजचा तरुण या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना स्नेह भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, सचिव अशोक बाफना, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे. संचालक प्रल्हाद जांभुळकर, दत्ता असवले, राज खांडभोर, प्राचार्य अशोक गायकवाड व सर्व प्राध्यापक व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
जयंती कार्यक्रमाचे आयोजित नियोजन आजी माजी विद्यार्थ्यांनी केले होते.
प्रास्ताविक प्राचार्य अशोक गायकवाड, सूत्रसंचालन प्रा. रोहिणी चंदनशिवे यांनी केले. आभार प्रा.अशोक कोकळे यांनी मानले.