वरसोली जिल्हा परिषद शाळेला आयएसओ मानांकन

166 views

लोणावळा दि.14 (प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनी वरसोली जिल्हा परिषद शाळेला को-ऑर्डीनेटर लक्ष्मीकांत सहादू यांच्या हस्ते ISO मानांकन पत्र प्रदान करण्यात आले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 2 months ago
Date : Fri Feb 14 2025

imageआयएसओ

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे यांनी ते स्वीकारले.

जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता सरसच असून कोरोना काळात नंतर अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

 याप्रसंगी वेहेरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुहास विटे, वरसोली गावचे सरपंच संजय खांडेभरड, उपसरपंच अरविंद बालगुडे, उपसरपंच नलिनी खांडेभरड, सदस्य मंदा पाटेकर, रजनी कुटे, नारायण कुटे, राहुल सुतार, विजय महाडिक, तसेच सरपंच सारिका खांडेभरड, सदस्य शाम येवले, हनुमंत शेलार, भागवत खांडेभरड, नामदेव पाटेकर, राजू खांडेभरड तसेच गावचे पो. पा. हिरा खांडेभरड, ग्रामसेवक दिपक शिरसाट आदी उपस्थित होते.




शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले. तर रविंद्र इथापे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


 




लेटेस्ट अपडेट्स